काय सुधारायचं… ऋषभ पंत संतापला! गौतम गंभीरनेही स्पष्टच सांगितले; सामना हरताच काय काय म्हणाले?


भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी पराभव दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत पहिला सामना 30 धावांनी जिंकला आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया दुसऱ्या डावात फक्त 93 धावांवर गारद झाली. तिसऱ्या दिवसाच्या (16 नोव्हेंबर) दुसऱ्या सत्रातच सामना संपला. दक्षिण आफ्रिकेसाठी स्पिनर सायमन हार्मरने दोन्ही डावांत 4-4 असे एकूण 8 बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे. सामन्यानंतर ऋषभ पंतने सांगितले काय सुधारायचं? तर गौतम गंभीरने पराभवाचे कारण स्पष्टच सांगितले.

सामन्यानंतर ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला? (What did Rishabh Pant say?)

ऋषभ पंत म्हणाला की “अशा प्रकारच्या सामन्यावर जास्त विचार करून काही फायदा नाही. हा स्कोर आम्ही सहज पार करू शकलो असतो. पण दुसऱ्या डावात आमच्यावर दबाव वाढला. टेम्बा आणि बॉश यांनी अप्रतिम भागीदारी केली आणि त्यातूनच ते पुन्हा सामन्यात परतले.

पुढे तो म्हणाला की, विकेटवर मदत होती, 120 असा स्कोर कधी कधी अवघड ठरू शकतो. पण संघ म्हणून आपण दबाव झेलून परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा होता. काय सुधारायचं आहे याबद्दल अजून विचार केलेला नाही, सामना नुकताच संपला आहे. पुढच्या वेळी आम्ही नक्कीच जोरदार पुनरागमन करू.”

कोच गौतम गंभीर काय म्हणाला? (What did coach Gautam Gambhir say?)

भारतीय संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे कोच गौतम गंभीर यांचे चेहरेवरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. त्यानेही स्पष्टच सांगितले की, आम्हाला अशीच खेळपट्टी हवी होती… पण आम्ही नीट खेळलो नाही, म्हणून असं झालं. 124 धावा सहज चेस करता येण्यासारख्या होत्या.

टेम्बा बावुमाने कायम ठेवला विक्रम

नाणेफेक जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. मात्र, भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 189 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि केवळ 30 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची अवस्था पुन्हा ढासळली आणि संपूर्ण संघ 153 धावांत गुडघे टेकला. त्यामुळे भारताला फक्त 124 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले असे वाटत होते. पण भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून टेम्बा बावुमा आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळला आहे, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने तब्बल 10 सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवली जाईल.

हे ही वाचा –

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव; टीम इंडियाचं WTC चं गणित बिघडलं, Points Table मध्ये मोठी घसरण, आता श्रीलंकाही पुढे!

आणखी वाचा

Comments are closed.