Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Pimpri Chinchwad Politics : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, कांचन जावळेंकडून मतदारांना आमिष
नगरसेवक व्हायचंय, म्हणून मतदारांना 50 टक्क्यांत वस्तूंचं आमिष दाखवलंय. पिंपरी चिंचवडमध्ये ‘हे’ कुठं सुरुये?
ऍंकर : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना पन्नास टक्क्यांत गृहउपयोगी वस्तूंचं प्रलोभन दाखवलं गेलंय. महागाईच्या जमान्यात मतदारांना हे आमिष दाखवून मतं मिळविण्याचा यामागचा हेतू आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून कांचन अमोल जावळे लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून त्यांना तिकीट हवंय अन त्या तिकिटावर नगरसेवक होण्याचं त्यांचं स्वप्नं आहे. यासाठी त्यांनी मतदारांना अशा प्रकारे आमिष दाखवलंय. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मुलांसाठी सायकल यांसह अनेक वस्तू 50 टक्क्यांत उपलब्ध करत, प्रलोभन दाखवलंय. महागाईच्या जमान्यात ग्राहक अर्थात मतदारांकडून याचा फायदा घेतला जातोय.
Comments are closed.