बालकाने पालकाला शिकवू नये, आमदार विजयसिंह पंडितांचा योगेश क्षीरसागरांना टोला


पलंग: नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील राजकारणात (Beed Politics) उलथापालथ होत असल्याचं दिसून येतंय. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) मोठा धक्का बसला आहे. बीडमधील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे बंधू योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ (BJP Join) हाती घेतलं आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित ( MLA Vijaysinh Pandit)  यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केलीय. बालकाने पालकाला शिकवण्याची गरज नाही, एखादा बालक दादांना ज्ञान देतो हे हास्यास्पद असल्याचा टोला देखील पंडीत यांना लगावला आहे.

कार्यकर्त्यांना खिंडीत गाठून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या बालकाने केले

योगेश क्षीरसागर यांच्या टीकेला विजयसिंह पंडित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बालकाने पालकाला शिकवण्याची गरज नाही एखादा बालक दादांना ज्ञान देतो हे हास्यास्पद असल्याचे म्हणत पंडितांनी खोचक टीका केली. राष्ट्रवादीमधील घडी विस्कटलेली नसून त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्याच कार्यकर्त्यांना खिंडीत गाठून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या बालकाने केले आहे. तर त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरु आहे. मात्र राजीनामा देणारे त्यांचेच कर्मचारी असल्याचं पंडित यांनी यावेळी म्हटलं आहे.

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्टरावादी  शिंदेंच्या शिवसेनेला आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेणार

दरम्यान, बीड नगर परिषदेसाठी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठरले आहे. शिंदेंच्या शिवसेनेला आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेऊन नगरपालिकेसाठी तीन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या 52 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्व उमेदवार ठरले असून पक्षाकडे यादी पाठवण्यात आली आहे. उद्या यावर शिक्कामोर्तब होणार असून उमेदवारी अर्ज देखील दाखल केले जाणार असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले आहे. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Beed : बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्का, आमदार संदीप क्षीरसागरांच्या बंधूंनी साथ सोडली, पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश

आणखी वाचा

Comments are closed.