शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी ५ उमेदवारांचे अर्ज सादर; रत्नागिरी नगर परिषद निवडणूक

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाच उमेदवारींनी आपले अर्ज सादर केले.
आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.प्रभाग क्र.३ ब मधून प्रसाद सावंत, प्रभाग क्र. १५ अ- राजश्री शिवलकर, प्रभाग क्र.१५ ब मधून अमित विलणकर, प्रभाग क्र.८ ब मधून साजीदखान पावसकर, प्रभाग क्र.९ ब मधून नाझनीन हकीम यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे उपस्थित होते.

Comments are closed.