Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
नवी मुंबईत गेल्या पाच वर्षापासून नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे. पालिकेचा
कारभार आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी हाकत आहेत. नगरसेवक नसल्याने अधिकार्यांवर अंकुश नसल्याचे मत सामाजिक संस्था , माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलंय. गेल्या पाच वर्षात गरज नसलेल्या कामांवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोप करण्यात आलाय..
इतर महत्वाच्या घडामोडी – 16 NOV 2025
जिथे शक्य तिथे युती, इतर ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संभाजीनगरमधील कार्यक्रमातून पुनरुच्चार… तर भाजपच नंबर एकचा पक्ष ठरेल, फडणवीसांना विश्वास…
आमचा पक्ष स्वतंत्र आणि सक्षम, काँग्रेसच्या मुंबईतील स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक विधान….
निवडणुकीत लोक पैसे घेतात आणि त्यांना वाटेल तिथेच मत देतात, प्रफुल्ल पटेलांचं वादग्रस्त विधान..तर देवेंद्र फडणवीसांची मात्र सावध भूमिका….
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला योगेश क्षीरसागरांचा रामराम, संभाजीनगरात फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश, पक्षांतर्गत नाराजीचं कारण देत पक्षांतर
आगामी निवडणुकीत मतदान करा आणि गृहउपयोगी वस्तूंवर ५० टक्के सुट मिळवा… पिंपरी-चिंचवडमध्ये इच्छूक उमेदवार कांचन जावळेंकडून मतदारांना थेट आमिष…
मुंबईच्या वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टीचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप… वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा, तर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या सूचना…
Comments are closed.