एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय


दोहा: भारताला क्रिकेटमध्ये दोन धक्के बसले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला 30 धावांनी पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला. तर, आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ संघ आमने सामने आले होते. ही स्पर्धा टी 20 प्रकारात सुरु आहे. पाकिस्ताननं भारताला नाणेफेक जिंकून फंलदाजीचं आमंत्रण दिलं होतं. यूएई विरुद्ध धावांचा डोंगर उभ्या करणाऱ्या भारताचे फलंदाज पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरले. अपवाद फक्त वैभव सूर्यवंशी ठरला. वैभवनं 45 धावांची खेळी केली, इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळं भारताचा संघ केवळ 136 धावांवर बाद झाला पाकिस्ताननं हे आव्हान 2 विकेट गमावत पूर्ण केलं.

वैभव सूर्यवंशी फॉर्ममध्ये, इतरांकडून निराशा

भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या दोघांनी केली. मात्र, प्रियांश आर्य 10 धावा करुन बाद झाला. यानंतर नमन धीर आणि वैभव सूर्यंवशी या दोघांनी भारताचा डाव सावरला. भारताची दुसरी विकेट 79 धावांवर गेली. नमन धीर 35 धावा करुन बाद झाला.  त्यानंतर नियमित अंतरानं भारताच्या विकेट पडत राहिल्या. वैभव सूर्यवंशी 45 धावांवर बाद झाला. इतर फलंदाज  मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कॅप्टन जितेश शर्मा 5 धावा काढून बाद झाला.  रमण दीप आणि हर्ष दुबे यांनी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भारताचा संघ 136 धावांपर्यंत पोहोचू शकला.

137 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननं भारतावर 8 विकेटनं विजय मिळवला. पाकिस्तानचे केवळ दोन फलंदाज बाद करण्यात भारताला यश आलं. पाकिस्तानच्या माझ सदाकतच्या नाबाद 79 धावांच्या जोरावर त्यांनी ही मॅच 8 विकेटनं जिंकली.  भारता पाकिस्तानच्या दोन विकेट घेता आल्या. मोहम्मद नदीम 14 आणि यासिर खान 11 धावा करुन बाद झाले. तर मोहम्मद फरिक 16 धावा करुन नाबाद राहिला.  भारताकडून यश ठाकूनं 1 तर सुयश शर्मानं 1 विकेट घेतली.

दरम्यान, भारतानं स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या दुसऱ्याच मॅचमध्ये भारताचा संघ केवळ 136 धावा करु शकला. याचं प्रत्युत्तर देताना  पाकिस्ताननं केवळ 2 विकेट गमावून विजय मिळवला. आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारतानं दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला असून ब गटात भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, पाकिस्तान 2 विजयासह पहिल्या स्थानावर आहे

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.