Pregnancy Healthcare: प्रेग्नन्सीच्या काळात संसर्गापासून बचावासाठी हे उपाय महत्त्वाचे

प्रेग्नन्सी हा स्त्रियांच्या आयुष्यातला सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ असतो. या काळात स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं. या काळात शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे आईच्या आरोग्यासह बाळाच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात स्वच्छता राखणे, संतुलित आहार घेणे आणि आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ( Tips to avoid infections during pregnancy )

हातांची स्वच्छता
संसर्ग टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोणतीही गोष्टी करण्यापूर्वी किमान २० सेकंद साबण आणि पाण्याने हात धुणे. यामुळे फ्लू, सर्दी आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण होते.

पौष्टिक अन्न
या काळात मजबूत प्रतिकारशक्तीसाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी आहारात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्य, दही, डाळी आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. कमी शिजवलेले किंवा फास्ट फूड खाणे टाळा, कारण यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो.

लसीकरण
गरोदरपणात फ्लू किंवा टिटॅनससारखे काही संसर्ग गंभीर ठरू शकतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण करून घ्या. या लसी आई आणि बाळ दोघांनाही संसर्गापासून वाचवतात.

झोप आणि विश्रांती
थकवा आणि ताणतणावाचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलेने दररोज ८-९ तास झोप घेणं आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

स्वच्छता
घरात स्वच्छता राखणं गरजेचं आहे. स्वयंपाकघर आणि बाथरूम नियमितपणे स्वच्छ करा. कपडे आणि अंथरूण उन्हात वाळवा जेणेकरून त्यात जीवाणू वाढणार नाहीत.

हायड्रेशन
गरोदरपणात पुरेशा प्रमाणात पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तसेच पाण्यातून होणारे संसर्ग टाळण्यासाठी नेहमी उकडलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्यावे.

रुग्णांपासून अंतर
फ्लू, खोकला, सर्दी किंवा इतर कोणत्याही संसर्गाने ग्रस्त असलेल्या लोकांशी संपर्क टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. बाहेर जाताना मास्क घाला आणि गरज पडल्यास हँड सॅनिटायझर वापरा.

आरोग्य तपासणी
गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे कोणताही संसर्ग किंवा मोठी समस्या ओळखण्यास मदत होते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

Comments are closed.