चांद्रयान-4 मिशनला मान्यता, 2027 मध्ये लॉन्च

2035 पर्यंत भारताचे अंतराळ स्थानक : इस्रोचा रोडमॅप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत अंतराळात नवनवे यश मिळवत असून या यशामागे इस्रोच्या वैज्ञानिकांचे योगदान आहे. इस्रो आता जगाला पुन्हा एकदा स्वत:चे सामर्थ्य दाखवून देण्यासाठी तयार असून चालू आर्थिक वर्षात आणखी 7 प्रक्षेपण मोहिमा साकार होणार आहेत. तसेच भारताचे पहेले मानवयुक्त अंतराळयान 2027 पर्यंत प्रक्षेपित करण्याच्या योजनेवर काम केले जात आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी इस्रो अंतराळयान उत्पादनक्षमतेला तीनपट वाढविणार असल्याचे सांगितले आहे.

इस्रो विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगक्षमतेत वेगाने विस्ताराच्या टप्प्यात आहे. इस्रो आणखी 7प्रक्षेपण मोहिमांची योजना आखत असून यात एक कमर्शियल कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि अनेक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही मिशन्स सामील आहेत. पहिला पीएसएलव्ही पूर्णपणे भारतीय असशल ही एक खास बाब असणार असल्याचे नारायणन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

केंद्र सरकारने चांद्रयान-4 मोहिमेला मंजुरी दिली आहे. चंद्रावरून नमुने आणण्याची ही मोहीम असेल. याचबरोबर इस्रोने 2028 पर्यंत चांद्रयान-4 प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. तसेच जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजेन्सीसोबत मिळून लूनर पोलर एक्स्प्लोरेशन प्रोग्रामवरही काम सुरू आहे. इस्रो पुढील तीन वर्षांमध्ये अंतराळयान उत्पादनाला तीनपट वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून वाढत्या मोहिमांच्या मागण्या पूर्ण करता येऊ शकतील.

भारताचे स्वत:चे अंतराळस्थानक

इस्रो 2035 पर्यत स्वत:चे भारतीय अंतराळस्थानक निर्माण करण्यावरही काम करत आहे. याच्या 5 मॉड्यूल्सपैकी पहिला 2028 पर्यंत कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. यामुळे स्वत:चे अंतराळ स्थानक असलेला भारत तिसरा देश ठरणार आहे,. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे आयुर्मान संपुष्टात येण्याच्या नजीक आहे, तर चीनचे तियांगोंग पूर्णपणे कार्यान्वित आहे.

मानवरहित परीक्षण मोहीम

भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळमोहीम ‘गगनयान’चे केवळ वेळापत्रक बदलण्यात आले आहे. मानवरहित मोहीम चालू वर्षातच पार पडण्याचे नियोजन होते, तर मानवयुक्त मोहिमेची योजना नेहमीच 2027 साठी आखण्यात आली होती आणि या कालमर्यादेत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. भारतीय अंतराळवीरांसोबत पहिल्या उ•ाणापूर्वी तीन मानवरहित परीक्षण मोहिमा पार पडतील अशी माहिती इस्रो प्रमुखांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींचा निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोला भारतीय अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणण्याच्या दिशेने काम करण्याचा निर्देश दिला आहे. भारताची दीर्घकालीन मानव-अंतराळ उ•ाण योजना जगातीच्या अग्रगण्य अंतराळशक्तींमध्ये स्थान मिळवून देणार आहे. अमेरिका आर्टेमिसच्या अंतर्गत चंद्रावर मानवयुक्त मोहीम पाठविण्याची योजना आखत आहे, तर चीनने स्वत:च्या पहिल्या मानवयुक्त मोहिमेसाठी 2030 चे लक्ष्य बाळगले असल्याची माहिती नारायणन यांनी दिली.

जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताची हिस्सेदारी सध्या जवळपास 2 टक्के आणि 2030 पर्यंत हे प्रमाण वाढवून 8 टक्के करण्याच्या दिशेने इस्रो काम करत आहे. भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचे वर्तमान मूल्य जवळपास 8.2 अब्ज डॉलर्स आहे. तर 2033 पर्यंत हे मूल्य 44 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अनुमान आहे, तर जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था सद्यकाळात जवळपास 630 अब्ज डॉलर्सची आहे. 2035 पर्यंत हे प्रमाण 1.8 लाख कोटी डॉलर्सपर्यत पोहाचू शकते.

Comments are closed.