एमजीच्या 'या' कारवर 4 लाख रुपयांची सूट, किती दिवस सुरू राहणार ऑफर वाचा…

MG कार सवलत : तुम्ही नवीन कार खरेदी करण्यास तयार आहात का, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एमजी कंपनीच्या कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी खास असणार आहे. नोव्हेंबर महिन्यात काही एमजी कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे.
खरं तर, दिग्गज ऑटो कंपनी MG भारतात विविध सेगमेंटमध्ये वाहने विकते. एमजी कंपनीच्या अनेक गाड्या भारतात लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनी या महिन्यात आपल्या काही लोकप्रिय गाड्यांवर भरघोस सूट देत आहे.
यापैकी काही कारवर कंपनीकडून चार लाख रुपयांची सूट मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही एमजी कंपनीच्या कोणत्या गाड्यांवर सध्या मोठी सूट मिळत आहे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या वाहनांवर सर्वाधिक सवलत उपलब्ध आहे
एमजी ग्लुसेस्टर – एमजी कंपनीच्या या कारवर कंपनीकडून सर्वाधिक सूट मिळत आहे. या कारवर कंपनी चार लाख रुपयांची सूट देत असल्याचे समोर आले आहे.
यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनसचाही समावेश आहे. फुल साइज एसयूव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी ही नक्कीच चांगली संधी असणार आहे.
MG ZX EV – MG ZS EV इलेक्ट्रिक ही कंपनीची लोकप्रिय SUV आहे. या कारला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या कारवर कंपनीकडून 1.25 लाख रुपयांची सूट दिली जात आहे.
पण ही ऑफर फक्त बेस मॉडेलवरच लागू आहे. विशेष म्हणजे, कंपनी इतर व्हेरियंटवर 49,000 रुपयांची लॉयल्टी आणि कॉर्पोरेट सूट देत आहे.
एमजी हेक्टर – MG च्या मिड-साईज SUV Hector वर देखील मोठी सूट मिळत आहे. कंपनी या कारवर 90 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही एक लोकप्रिय एसयूव्ही देखील आहे. त्यामुळे तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करू शकता.
कारण या महिन्यात तुम्ही ही कार खरेदी केल्यास तुम्हाला 90000 पर्यंतचा फायदा मिळेल. या SUV च्या काही व्हेरियंटवर कंपनीकडून 65 हजारांपर्यंतच्या ऑफर देखील उपलब्ध आहेत.
Comments are closed.