ए निघ माxxx.. पाकिस्तानच्या खेळाडूकडून नमन धीरला शिवीगाळ; मैदानात नको नको ते केलं, नेमकं काय घड
साद मसूद ते नमन धीर व्हिडिओ भारत विरुद्ध पाक : भारत अ आणि पाकिस्तान अ (India A and Pakistan A) यांच्यात रविवारी झालेल्या आशिया कप रायझिंग स्टार्सच्या (Asia Cup Rising Stars) सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंच्या कृतींमुळे वाद निर्माण झाला. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्येही पाकिस्तानच्या खेळाडूंच्या वागणुकीवर आयसीसीकडून कारवाई झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु पाकिस्तानच्या संघाने पुन्हा एकदा एक लज्जास्पद कृत्य केले.
साद मसूदचं लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद
सामन्यादरम्यान, पाकिस्तानचा युवा फिरकीपटू साद मसूदने (Saad Masood) भारतीय उपकर्णधार नमन धीरला (Naman Dhir) बाद केल्यानंतर अत्यंत आक्रमक सेलिब्रेशन केले. धीरने 20 चेंडूत 35 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये सहा चौकार आणि एक षटकार होता. साद मसूदचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहते आता त्याच्या या कृतीवर टीका करत आहेत, ते स्वस्त आणि खेळाच्या भावनेविरुद्ध आहेत असे म्हणत आहेत.
साद मसूद कडून आक्रमकता🔥pic.twitter.com/7B31WFJKrR
— आम्ही विश्वचषक 26 जिंकत आहोत (@Depressed_Dani_) 16 नोव्हेंबर 2025
नमन धीरला पाकिस्तानी खेळाडूने केली शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
कतरची राजधानी दोहा येथे आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मधील सहावा सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 8.4 व्या षटकात ही घटना घडली. ज्यावेळी पाकिस्तानी खेळाडू साद मसूदने गोलंदाजी करत होता. त्याने नमन धीरला आऊट केले, त्यानंतर साद मसूदने नमन धीरला शिवीगाळ केली आणि त्याला निघून जाण्याचा इशाराही केला. मात्र, नमन धीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि सादकडे पाहत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यातील वातावरण तापले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साद मसूद ते भारतीय गायीचे पिस पिणारे.
Nikal madarchod mutar pine walay 😂🤣🇮🇳💩 pic.twitter.com/qSbRytzwSn
— पेरी (@पेरीक्रिक) 16 नोव्हेंबर 2025
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची 19 षटकांत केवळ 136 धावांवरच ऑलआऊट झाला. इंडिया-अ कडून सलामीवीर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक 45 धावा केल्या. 28 चेंडूंमध्ये त्याने 5 चौकार आणि 3 भक्कम षटकार ठोकले. त्याच्यासोबत नमन धीरनेही 20 चेंडूंवर 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 35 धावांची लक्षणीय खेळी केली.
भारताने दिलेल्या 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान-अ संघाने फक्त 2 गडी गमावून 137 धावा करत सामना जिंकला आणि थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. मोहम्मद फैकने अखेरच्या क्षणी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. मात्र त्यानंतर फैकने केलेली एक कृती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.