नौदलाची ताकद वाढवली जाईल.

24 नोव्हेंबरला ताफ्यात सामील होणार ‘माहे’ युद्धनौका

वृत्तसंस्था/ कोची

पाणबुडीविरोधी युद्धासाठी ‘माहे’ युद्धनौका 24 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील केली जाणार आहे. ही एक शॅलो-वॉटर क्राफ्ट आहे, म्हणजेच ही युद्धनौका समुद्राऐवजी किनारी क्षेत्र किंवा नदीचे मुख यासारख्या उथळ पाणी असलेल्या क्षेत्रांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. टॉरपीडो, अनेक भूमिकायुक्त पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र, अत्याधुनिक रडार आणि सोनारने ही युद्धनौका सुसज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली आहे.

कोचीन शिपयार्ड लिमिटेकडून पाणबुडीविरोधी युद्धासाठी युद्धनौका निर्माण केल्या जात असून यात माहे युद्धनौका पहिली ठरली आहे. हे नाव पु•gचेरीचे ऐतिहासिक बंदर माहेच्या नावावर ठेवण्यात आले आहे, तसेच हे नाव भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे.

स्वत:ची शक्ती, लपून काम करण्याची क्षमता आणि वेगासह ही युद्धनौका पाणबुड्यांची शिकार करणे, किनारी गस्त घालणे आणि भारताच्या महत्त्वपूर्ण सागरी मार्गांची सुरक्षा करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. टॉरपीडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेटने सुसज्ज माहे-श्रेणीची पहिली युद्धनौका 23 ऑक्टोबर रोजी नौदलाला सोपविण्यात आली होती अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

24 नोव्हेंबर रोजी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये ‘माहे’ला सामील करण्यासोबत्च नौदलाच्या स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठला जाणार आहे. ‘माहे’ आत्मनिर्भर भारत पुढाकारात नौदलनौका डिझाइन आणि निर्मितीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करते. आकाराने छोटी असूनही ही युद्धनौका शक्तिशाली आहे आणि वेग, अचूकतेचे प्रतीक आहे. ही सर्व वैशिष्ट्यो किनारी क्षेत्रांमध्ये दबदबा टिकविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीसह माहे-श्रेणी भारताचे युद्धनौका डिझाइन, निर्मिती अणि एकीकरणात वाढते प्राविण्य दर्शविते असे नौदलाच्या प्रवक्त्याकडुन म्हटले गेले.

मलाबार किनाऱ्यावरील ऐतिहासिक शहराचे नाव देण्यात आलेल्या या युद्धनौकेच्या प्रतीक चिन्हात ‘उरुनी’, केरळचे मार्शल आर्ट ‘कलारिप्पायट्टू’ची तलवार दिसते, जी चपळाई, अचूकता आणि मारकक्षमतेचे प्रतीक आहे.

Comments are closed.