रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज

राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येणाऱ्या अनगर नगरपंचायतीमध्ये धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली. उज्वला थिटे या अनगर नगरपरिषदेच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याचा हा डाव उज्ज्वला थिटे यांनी उधळून लावला आणि सोमवारी पहाटे 5 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments are closed.