नक्की काहीतरी गडबड…द. अफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव होताच चेतेश्वर पुजारा सगळं बोलून गेला; नेम


Cheteshwar Pujara On Ind vs SA 1st Test: दक्षिण अफ्रिकेने भारत विरुद्धच्या (India vs South Africa 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच विजय मिळत दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर विविध स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) देखील काहीतरी गडबड असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भारतात येऊन कोणीतरी टीम इंडियाचा पराभव करतोय, हे कधीही मान्य नसणारं आहे, असं चेतेश्वर पुजारा एका सामन्यानंतर म्हणाला.

चेतेश्वर पुजारा काय काय म्हणाला? (Cheteshwar Pujara On Ind vs SA 1st Test)

खेळपट्टी, वातावरण या सगळ्या कारणामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लड यांसारख्या देशात हरला तर ते मान्य आहे. परंतु भारतात टीम इंडियाचा असा दारुण पराभव होतोय, हे मान्य नाही. टीम इंडियाकडे ज्या पद्धतीची गुणवत्ता आहे, भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतोय. यामुळे घरच्या मैदानावर असा पराभव होणं चुकीचं आहे. भारताचा अ संघ दक्षिण अफ्रिकेच्याविरुद्ध मैदानात उतरवला, तरीही भारतीय अ संघ त्यांचा पराभव करु शकतो. इतकी गुणवत्ता भारतीय खेळाडूंकडे आहे. काहीतरी नक्की गडबड आहे. शुभमन गिल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर यांचे प्रथम क्षेणीतील रेकॉर्ड चांगले आहे. कोणत्या खेळपट्टीवर भारताची जिंकण्याची शक्यता जास्त आहे, हे पाहिलं पाहिजे. अशी खेळपट्टी असल्यास विरोधी संघाही सामना जिंकण्याच्या शर्यतीत बरोबरीत येतो. चांगल्या खेळपट्टीवर कसोटी सामने खेळा, असं चेतेश्वर पुजारा म्हणाला.

सामना कसा राहिला?

नाणेफेक जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. मात्र, भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 189 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि केवळ 30 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची अवस्था पुन्हा ढासळली आणि संपूर्ण संघ 153 धावांत गुडघे टेकले. त्यामुळे भारताला फक्त 124 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले असे वाटत होते. पण भारताला अनपेक्षित 30 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवली जाईल.

संबंधित बातमी:

Ind vs SA 1st Test: टेम्बा बवुमाचं कधी न पाहिलेलं सेलिब्रेशन, वॉशिंग्टन सुंदर रडला; द. अफ्रिकेने पहिला कसोटी सामना जिंकताच मैदानात काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.