आता तरी शमीला बोलवा…! टीम इंडियाच्या पराभवानंतर दादा भडकला; गंभीरला दिला कडक इशारा, नेमकं काय
गौतम गंभीरवर सौरव गांगुली: कोलकात्यातील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने धुव्वा उडवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारताची ताकद म्हणून ओळखली जाणारी फिरकी आता खरोखरच कमकुवत झाली आहे का? भारताने घरच्या मैदानावर स्पिनिंग ट्रॅक तयार करणे आता बंद करावी का? अवघ्या तीन दिवसांत कसोटी संपून भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर ईडनच्या पिचवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मात्र क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने पिचवरील सर्व आरोप फेटाळून लावत टीम इंडियाला कडक सल्ला दिला आहे.
सौरव गांगुली कडक शब्दात नेमकं काय म्हणाला?
गांगुली म्हणाला की, ईडन गार्डन्सची खेळपट्टी भारतीय संघाने जशी मागणी केली होती तशीच तयार करण्यात आली. पण घरच्या मैदानावर वर्चस्व मिळवण्यासाठी पिचमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करणे आता बंद केले पाहिजे. त्यांच्या मते, चांगली पिच म्हणजे अशी जी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संधी देते, ज्यावर 350+ धावा ही होतील आणि गोलंदाजांनाही विकेट मिळवण्याचा आत्मविश्वास येईल.
“शमीला घ्या… आशा करतो गंभीर ऐकत असतील”
दादा पुढे म्हणाला की, गौतम गंभीरने खेळपट्टी बदलण्यापेक्षा आपल्या गोलंदाजी सामर्थ्यावर विश्वास ठेवायला हवा. बुमराह आणि सिराज चांगली गोलंदाजी करत आहेतच, पण मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शमीमध्ये भारताला एकहाती सामना जिंकवण्याची ताकद आहे. गांगुलींच्या या विधानावरून स्पष्ट होतं की ते कसोटीसाठी विशेष स्पिन पिचची मागणी करणं योग्य मानत नाहीत.
गंभीरचं पिचबाबतचं वक्तव्य
कसोटी संपल्यानंतर गंभीर यांनी सांगितलं होतं की त्यांना हवी तशीच पिच मिळाली. क्यूरेटरने पूर्ण सहकार्य केलं. 124 धावा म्हणजे सहज पाठलाग करता येण्यासारखा स्कोअर होता, आणि भारत हरला तो खराब खेळामुळे, पिचमध्ये काही दोष नव्हता, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
मात्र गंभीर कितीही बचाव करत असले तरी वास्तव स्पष्ट आहे. 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, स्पिन पिचची मागणी केली आणि त्याचाच फटका भारतीय संघालाच बसला.
शमीवर गांगुलींचा ठाम विश्वास
शमी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय असूनही फिटनेस निकषांच्या आधारावर त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. 64 टेस्टमध्ये 229 बळी घेणाऱ्या शमीने शेवटचा कसोटी सामना 2023 मधील WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.