शिवसेनाप्रमुखांना आदरांजली! शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे नतमस्तक; शिवसेनाप्रेमी, शिवसैनिकांची गर्दी

ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनगटात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी शिवतिर्थावरील स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.