मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज
अमरावती बातम्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे चुलत मामेभाऊ यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. आल्हाद कलोती (Aalhad Kaloti) हे चिखलदरा नगर परिषदेतून (Chikhaldara Municipal Council) नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. तर यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवीणाऱ्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चिखलदऱ्याच्या विकासाला प्राधान्य देऊन रखडलेली विविध विकास कामं, पाणी पुरवठा समस्या आणी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचा मानस आल्हाद कलोती यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 12 ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर झाले असून अमरावती जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार आहे.
जिल्ह्यातील 12 ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर
आगामी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अमरावती जिल्ह्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची आणि राज ठाकरे यांच्या मनसेची अमरावती जिल्ह्यात युती झाली आहे. अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी येथे शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी येथे मनसे, शिवसेना युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. दर्यापुरातून नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी जाहीर झालीय. तर अंजनगाव सुर्जी येथून शिवसेना उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्ष पदासाठी युतीची उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारांची यादी:
अंजनगाव सुर्जी – अविनाश गायगोले
चिखलदरा – राजेंद्रसिंह सोमवंशी
अचलपूर – रुपाली अभय माथने
दर्यापूर – नलिनी प्रकाश भारसाकळे
चांदूर बाजार – कांता अहीर
चांदूर रेल्वे – स्वाती मेटे
मोर्शी – रश्मी उमाले
वरूड – ईश्वर सलामे
शेंदूरजना घाट – सवर्णा वरखेडे
धामणगाव रेल्वे – अर्चना रोठे
नांदगाव खंडेश्वर – स्वाती पाठक
धारक- सुनील चौथमल
निवडणूक प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार; शेवटचा एक तास उरला असताना हजारोची गर्दी
बुलढाण्यातील चिखली येथील नगरपरिषदेतील निवडणूक विभागाच्या कार्यालयासमोर मोठा गोंधळ बघायला मिळत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक तास उरला असताना हजारोंच्या संख्येने उमेदवार आणि त्यांचे समर्थक निवडणूक विभागाच्या कार्यालयात शिरूर गोंधळ करताना चे चित्र आहे पोलीस बंदोबस्त असतानाही हजारोंच्या संख्येने नागरिक आणि उमेदवार थेट निवडणूक विभागाच्या कार्यालयात गर्दी करताना चे चित्र आणि यामुळे निवडणूक विभागाचा नियोजन शून्य कारभारी समोर आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.