गिल-कुलदीप बाहेर, तर पंत कर्णधार; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कशी असेल Playing XI?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका खेळत – 11 दुसरी कसोटी : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका 1-1 ने समतोल करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलांची शक्यता आहेत.
शुभमन गिल आणि कुलदीप यादव जाणार बाहेर…
पहिली कसोटी केवळ तीन दिवसांत संपल्याने आता दुसऱ्या सामन्यासाठी काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. कर्णधार शुभमन गिलच्या खेळण्यावर शंका कायम आहे. पहिल्या कसोटीदरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. दुसऱ्या कसोटीपूर्वी काही दिवस बाकी असल्याने तो खेळतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय कुलदीप यादव हा देखील दुसऱ्या कसोटीत उपलब्ध नसतील अशी शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार, त्याचे लग्न नोव्हेंबरच्या अखेरीस होणार असून तो यासाठी बीसीसीआयकडे रजा मागितल्याचे समजते.
गिल आणि कुलदीप नसल्यास संभाव्य प्लेइंग-11
जर गिल आणि कुलदीप दोघेही उपलब्ध नसतील, तर टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकते. साई सुदर्शनची संघात पुनरागमनाची शक्यता आहे. गिल खेळला नाहीत तर त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल किंवा नितीश कुमार रेड्डी याला संधी मिळू शकते. ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे तिन्ही स्पिन पर्याय असतील. वेगवान माऱ्याचे नेतृत्व जसप्रीत बुमराह आणि मो सिराज करतील.
गिल खेळला तर…
जर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीसाठी फिट झाला, तर फक्त एकच बदल पाहायला मिळू शकतो. कुलदीप यादवच्या जागी साई सुदर्शन संघात येईल, फलंदाजीत यशस्वी जैसवाल, के.एल. राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल हे निश्चित मानले जात आहेत. गिल उपलब्ध नसतील तर कर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे जाईल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (शुबमन गिल खेळत नसेल तर)
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल/नितीश कुमार रेड्डी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक, कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (शुबमन गिल खेळल्यास)
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.