मोठी बातमी! विरोधकांकडून टीकेची झोड उठताच काशिनाथ चौधरींच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती
पालघर बातम्या: पालघर जिल्ह्याच्या भाजपच्या (BJP) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhary) यांच्या भाजप (BJP) पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पालघर भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र लिहत माहिती दिली आहे. काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने रोखण्याचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेय. गडचिंचले साधू हत्याकांड (Gadchinchale sadhu case) प्रकरणात भाजपने मागील काळात काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अशातच भाजपमध्ये काशिनाथ चौधरी यांनी प्रवेश केल्यानंतर राज्यभरातून विरोधकांकडून गंभीर आरोप करत टीकेची झोड उठवण्यात आली होती. दरम्यान आता वाढता विरोध लक्षात घेता भाजप पक्षश्रेष्ठीने आता काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती दिली आहे.
पालघर साधू हत्याकांड (Palghar Mob Lynching Case) प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही FIR किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाही, तरीही विषयाचा गांभीर्याने विचार करून काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे. अशी माहिती भाजप नेते आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे.
Palghar Kashinath Chaudhari : कोण आहेत काशिनाथ चौधरी?
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील एक राजकीय नेते आहेत. ज्यांचा उल्लेख प्रसिद्ध पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित केला जातो. या घटनेनंतर भाजपने त्यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून गंभीर आरोप केले होते, मात्र अलीकडे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चौधरी हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष (शरद पवार गट)चे स्थानिक नेते होते, पण 16 नोव्हेंबर 2025 रोजी एक मोठ्या जाहीर पक्षप्रवेशाद्वारे त्यांनी आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
काशिनाथ चौधरी: राज्य भेट आणि चर्चा
काशिनाथ चौधरी यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसपासून भाजपपर्यंत आहे.
पालघर साधू हत्याकांडात त्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते, परंतु स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने त्यांना पक्षात सामील करून घेतले आहे.
त्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे.
पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
पालघर साधू हत्याकांड आणि चौधरी यांचा संबंध 16 एप्रिल 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती.
या घटनेत 200 जणांना अटक झाली होती आणि चौधरी यांच्यावर या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपने केला होता.
या हत्याकांडाने राज्यभरात जोरदार राजकीय वादंग निर्माण झाले होते.
विरोधकांच्या मते, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपने पक्षात घेतल्यामुळे भाजपवर “दुटप्पीपणा” असल्याची टीका होत आहे.
सामाजिक आणि सार्वजनिक दबदबा आहे
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील बांधकाम व वित्त समितीचे माजी सभापती आणि स्थानिक नेता म्हणून ओळखले जातात.
आणखी वाचा
Comments are closed.