'या' खेळाडूसाठी करोडो खर्च करणार सीएसके! ऑक्शनपूर्वी जाणून घ्या फ्रँचायझीबद्दल सर्व माहिती

आईपीएल 2026 चा मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये होणार आहे. येथे सर्व फ्रॅंचायझी आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी उतरतील. पाच वेळची आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्जवर या ऑक्शनमध्ये सगळ्यांच्या नजरा असतील. अनेक स्टार खेळाडूंना रिलीज केलेली सीएसके मोठ्या पर्ससह ऑक्शनला सामोरे जाणार आहे, जिथे फ्रँचायझी काही मोठ्या नावांना आपल्या संघात सामील करण्याचा प्रयत्न करेल.

चेन्नई सुपर किंग्जची टीम सध्या रवींद्र जडेजाचा पर्याय शोधत आहे. भारतीय खेळाडूंमध्ये तसा योग्य पर्याय दिसत नाही. त्यामुळे फ्रँचायझी लियाम लिव्हिंगस्टोन किंवा ग्लेन मॅक्सवेल यापैकी कोणाला तरी आपल्या संघात घेण्याचा विचार करू शकते. हे दोन्ही खेळाडू मॅच फिनिशरची भूमिकाही उत्तमरीत्या पार पाडू शकतात.

याशिवाय, वेगवान गोलंदाजी ऑलराउंडर म्हणून फ्रँचायझी आंद्रे रसेल किंवा कॅमरून ग्रीन यापैकी कोणाला तरी संघात सामील करण्याचा विचार करू शकते. यामुळे क्रमांक 6 आणि 7 वर फलंदाजी करू शकणारा खेळाडू संघाला मिळेल.

वेगवान गोलंदाजीतही चेन्नई पुन्हा एकदा कमी किमतीत मथीसा पथिरानाला खरेदी करू शकते. मथीसा पथिरानासोबतच फ्रँचायझी वानिंदू हसरंगावरही मोठा डाव खेळू शकते.

फक्त विदेशीच नव्हे तर काही भारतीय खेळाडूंवरही चेन्नई सुपर किंग्ज मोठा डाव खेळू शकते. ज्यामध्ये पृथ्वी शॉचे नाव समाविष्ट होऊ शकते. फ्रँचायझीकडे आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन असे टॉप ऑर्डरमधील फलंदाज आधीच आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉला त्यांच्या बॅकअप म्हणून घेतले जाऊ शकते.

त्याचप्रमाणे फ्रँचायझी निशांत संधू सारख्या युवा खेळाडूवरही पैज लावू शकते, ज्यामुळे त्यांच्याकडे भारतीय स्पिन ऑलराउंडरचीही सोय राहील. रवि बिश्नोई आणि राहुल चाहर यांच्यावरही महेंद्रसिंग धोनी यांच्या सीएसकेच्या नजरा असू शकतात.

Comments are closed.