WPL 2026: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा ‘या’ तारखेपासून सुरू होणार! मोठी अपडेट समोर
वुमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या (WPL 2026) वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार महिला प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात 7 जानेवारीपासून होणार आहे, तर अंतिम सामना 3 फेब्रुवारीला खेळला जाईल. आगामी हंगामासाठी दोन शहरांची निवडही झाली आहे.
WPL 2026 ची पहिली फेज डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम मुंबई आणि बडोदा या दोन शहरांत खेळवला जाईल.
याआधीचे तीनही हंगाम मार्च महिन्यात सुरू झाले होते. पण यंदाचा हंगाम जानेवारीत खेळवला जाणार आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे भारतात होणारा टी-20 विश्वकप 2026. WPL 2026 चा पहिला टप्पा मुंबईत तर दुसरा टप्पा बडोद्यात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
WPL 2026 ची नीलामी 27 नोव्हेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. असे मानले जात आहे की याच कार्यक्रमादरम्यान वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली जाईल.
महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 2023 मध्ये खेळला गेला होता, ज्यात मुंबईने दिल्लीला हरवून विजेतेपद पटकावले. 2024 मध्ये आरसीबीने दिल्लीला पराभूत करत किताब जिंकला. तर 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने दिल्लीला हरवत विजेतेपद मिळवले. म्हणजेच दिल्लीला सलग तीन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता आगामी सीझनमध्ये कोणत्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होऊ शकतो? हे पाहणे खूप महत्त्वाचे असणार आहे.
Comments are closed.