मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात ह्या 5 खेळाडूंकडे दुर्लक्ष? शमी आणि सरफराजही यादीत!
गौतम गंभीर यांची (Gautam Gambhir) टी-20 विश्वचषक 2024 नंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात अनेक खेळाडूंना संधी मिळाली असली, तरी काही खेळाडू मात्र सतत दुर्लक्षित होताना दिसत आहेत. आता आपण अशा 5 खेळाडूंविषयी बोलणार आहोत, ज्यांना गंभीर यांच्या कोचिंगमध्ये पुरेशी दखल मिळत नाही.
या यादीतील पहिले नाव आहे सरफराज खानचे (Sarfaraz Khan) . 2024 च्या शेवटी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सरफराजने उत्तम कामगिरी केली होती, तरीही त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळत नाही. याशिवाय मोहम्मद शमीदेखील (Mohmmed Shami) टीममध्ये पुनरागमनाच्या शोधात आहे. त्याने रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
तसेच ऋतुराज गायकवाड, करुण नायर आणि अभिमन्यु ईश्वरन या खेळाडूंनाही गंभीर यांच्या कार्यकाळात सातत्याने संधी मिळत नाही.
Comments are closed.