भोपाळ: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोमवारी ग्वाल्हेरच्या मुक्कामात अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्य यांची मुलगी प्रियंका हिच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. दीनदयाळ नगर येथील आर्य यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांनी वधू-वरांना राम दरबाराचे चित्र देऊन आशीर्वाद दिले. तसेच वधू-वरांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.