तरुणींमध्ये वाढतोय फिंगर पियर्सिंग’चा ट्रेंड, तज्ज्ञांनी सांगितले स्टायलिश लुकसह आहेत अनेक धोके

फॅशनमध्ये नवनवीन ट्रेंड येतात आणि तरुणाई ते लगेच स्वीकारते. त्यातच आता एक वेगळाच ट्रेंड युवतींमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे फिंगर पियर्सिंग. साध्या रिंगऐवजी बोटाच्या त्वचेतच छोटीशी ज्वेलरी बसवणे, हा या ट्रेंडचा प्रकार. दिसायला आकर्षक असल्यामुळे अनेकांना या पियर्सिंगबद्दल उत्सुकता वाटते. (finger piercing trend safety fashion news)

काही दिवसांपूर्वी हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनची १२ वर्षांची मुलगी नॉर्थ वेस्ट हिचे फिंगर पियर्सिंग सोशल मीडियावर चर्चेत आले. इतक्या लहान वयात हे पियर्सिंग का केले? अशी चर्चा सुरू झाली. पण त्याचवेळी या पद्धतीबद्दल लोक अधिक जाणून घेऊ लागले.

फिंगर पियर्सिंग नक्की कसे केले जाते?
फिंगर पियर्सिंग म्हणजे डर्मल पियर्सिंग, ज्यात ज्वेलरी त्वचेच्या खाली बसवली जाते. त्वचेत एक लहानसा छिद्र केला जातो त्यात ज्वेलरीचा बेस सेट केला जातो वर फक्त सजावटीचा भाग दिसतो यात त्वचेच्या आरपार छिद्र नसल्यामुळे ते साधारण पियर्सिंगपेक्षा वेगळे असते.

दिसायला आकर्षक पण धोकाही तितकाच फिंगर पियर्सिंगचे फोटो पाहून अनेकांना ते करावंसं वाटतं. पण बोटे दिवसभर सतत वापरात असल्याने या भागात पियर्सिंग करणे नाजूक आणि धोकादायक ठरते. जसं की बोटे सतत वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे इन्फेक्शनचा धोका जास्त. पियर्सिंग एखाद्या वस्तूत अडकले तर त्वचा फाटण्याची शक्यता. चुकीच्या पद्धतीने झाले तर त्वचेवर कायमस्वरूपी डाग किंवा त्वचा लाल होणे, दुखणे किंवा सूज येणे. म्हणून हा ट्रेंड आकर्षक असला तरी बोटाचा भाग संवेदनशील असल्याने काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

काळजी कशी घ्यावी?

– पियर्सिंगनंतर हात नेहमी स्वच्छ ठेवा
– घरकाम, खेळ किंवा वजन उचलताना जपून वागा
– पियर्सिंगला वारंवार हात लावू नका
– त्रास वाढल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या

Comments are closed.