Balasaheb Thackeray Memorial Day : …अन् ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुन्हा एकत्र

मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र हे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज (17 नोव्हेंबर) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू दादरमधील शिवाजी पार्क याठिकाणी असलेल्या स्मृतीस्थळावर तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

Comments are closed.