Maharashtra Live Blog Updates: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपासून महाराष्ट्रासह देश-विदेशातील

ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेच्या RPF ने मुंबई विभागात विविध नियमभंगांमध्ये 8,184 जणांवर कारवाई केली

या कारवाईत  RPF ने 38.03 लाख दंड वसूल केला. तिकिटाविना प्रवास, महिलांच्या डब्यात अनधिकृत प्रवेश आणि चोरी या कृत्या विरोधात ही कारवाई  RPF कडून प्रामुख्याने केल्याचे दिसून येते

59 जणांवर रेल्वे मालमत्ता चोरीप्रकरणी कारवाई करण्यात आली असून जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 4.62 लाख इतकी आहे

17 जणांना दारू, गांजा आणि तंबाखूच्या अनधिकृत साठ्यासाठी अटक केली असून जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 8.21 लाख इतकी आहे

161 जणांना प्रवाशांच्या सामानाची चोरी व इतर गुन्ह्यांसाठी पकडले.

महिलांच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश हा सर्वाधिक सातत्याने होणारा नियमभंग असल्याने मोठ्या स्थानकांवर विशेष तपास मोहिमा राबवण्यात आल्या असून सीसीटीव्ही निगराणी आणि RPF तैनातीद्वारे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Comments are closed.