डॉ. उमर नबी सुसाइड बॉम्बर, बूट बॉम्बचा वापर करुन स्फोट, कारच्या टायरवर सापडले घातक रसायनाचे अंश
नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटासंबंधी (Delhi Blast) तपासात महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. स्फोटात (Delhi Blast) मारला गेलेला डॉ. उमर नबी हा सुसाइड बॉम्बरच होता. त्यासाठी त्याने ‘बूट बॉम्ब’चा वापर केला असून त्यासाठी टीएटीपी हे रसायन वापरल्याचा निष्कर्ष एनआयएने काढला आहे. या तपासात अमोनियम नायट्रेट आणि टीएटीपीचे अंश सापडल्याची माहिती समोर आली आहे. उमरच्या कारमध्ये सापडलेल्या बुटावर तसेच गाडीच्या टायरवरही टीएटीपीचे अंश आढळून आले आहेत.(Delhi Blast)
अमोनियम नायट्रेट आणि टीएटीपी (ट्रायॲसिटोन ट्रायपरॉक्साईड) ही अत्यंत संवेदनशील अशी स्फोटक रसायने मानली जातात. टीएटीपी हे रसायन अगदी सहज रगडले गेले तरी त्याचा स्फोट होतो. ही रसायने ‘मदर ऑफ सॅटन’ म्हणून दहशतवाद्यांच्या ठिकाणी ओळखले जातात.
कारमध्ये एक बूट आढळून आला असून टीएटीपीचा बुटाखाली वापर करून हा स्फोट घडवण्यात आला असल्याचे तपासातून स्पष्ट होत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात जखमी झालेल्या आणखी दोन व्यक्तींचा एलएनजेपी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १५ झाली आहे.
Delhi Blast: एका आरोपीस दहा दिवसांची एनआयए कोठडी
लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणातील एक आरोपी आमीर रशीद अली यास न्यायालयाने दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेला अली याच्यावर डॉ. उमर नबी याच्यासोबत दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. दिल्लीत त्याला अटक झाली होती.
Delhi Blast: अधिकाऱ्याचा भाऊ अटकेत
स्फोटानंतर प्रकाशझोतात आलेल्या फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भावाला गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशात अटक करण्यात आली आहे. हमूद अहमद सिद्दिकी यास हैदराबादेतून पकडण्यात आले. त्याच्यावर १० हजारांचे बक्षीस होते. त्याच्यावर १९८८ आणि १९८९ मध्ये हत्येचा प्रयत्न केल्या गुन्हाही नोंद आहे.
Who is Doctor Umar: डॉ. मोहम्मद उमर कोण आहे?
उमर हा हरियाणातील फरीदाबाद येथील अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. तपास यंत्रणांना संशय आहे की, तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेला आहे. उमर हा अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आदिल अहमद राथेरचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते. ज्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. आदिलच्या चौकशीनंतर सोमवारी फरीदाबादमध्ये छापा टाकण्यात आला आणि उमरचे नाव समोर आले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उमरची आई शहेमा बानो आणि भाऊ आशिक आणि झहूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांचा दावा आहे की, उमरने त्याच्या दोन साथीदारांसह कट रचला आणि फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून तो अंमलात आणला.
आणखी वाचा
Comments are closed.