Maharashtra Live Blog Updates: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची आजपासून छ


Maharashtra Live Blog Updates: मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आजपासून अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.