आजच तिढा सुटणार… टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढत, सूर्यवंशी किती वाजता दिसणार ॲक्शनमध्ये?
भारत अ वि ओमान रायझिंग स्टार्स एशिया कप लाइव्ह स्ट्रीमिंग: आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये रविवारी पाकिस्तानने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. ग्रुप-बी मधून पाकिस्तानने सेमीफायनलची मजल मारली आहे. मात्र दुसऱ्या सेमीफायनल स्लॉटसाठी तब्बल तीन संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. भारत A टीमला ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडण्याचा धोका अद्याप टळलेला नाही. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचू शकते, ते जाणून घ्या.
ग्रुप-B ची पॉइंट्स टेबल
पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारत 2 सामन्यांत 1 विजयासह 2 गुणांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमान आणि यूएई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. भारत आणि ओमान या दोन्ही संघांकडे समान प्रत्येकी 2 गुण आहेत. 18 नोव्हेंबरला भारत-ओमान सामना रंगणार असून दोन्ही संघांसाठी तो करो या मरोचा लढत ठरणार आहे. भारत जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये जाईल. जर ओमान जिंकल्यास त्याचे सेमीफायनल तिकीट पक्के होईल. म्हणजे आजचा सामना दोन्ही संघांसाठी सर्वस्व पणाला लावण्यासारखा आहे.
वैभव सूर्यवंशीची तुफानी बॅटिंग
या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी चमकतोय. पाकिस्तानविरुद्ध तो अर्धशतक चुकला, पण दमदार 45 धावा केल्या. दोन सामन्यांत त्याने 94.50 च्या सरासरीने 189 धावा ठोकल्या आहेत. यूएईविरुद्ध त्याने 42 चेंडूत 144 धावा करत धडाकेबाज खेळी केली होती. त्याच सामन्यात त्याने फक्त 32 चेंडूत शतक पूर्ण केले. पाकिस्तानविरुद्ध त्याने टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली होती. पण त्याच्या बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी काही जास्त काळ टिकले नाहीत आणि सामना हातचा गेला.
सामना कधी आणि कुठे होणार? (India A vs Oman Rising Stars Asia Cup Live Streaming)
भारत आणि ओमान यांच्यातील सामना 18 नोव्हेंबर रोजी कतारची राजधानी दोहा येथे असलेल्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.
थेट प्रसारण कुठे पाहता येईल? (When, where and how to watch IND vs OMN live)
सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV अॅपवर उपलब्ध असेल. तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर सामन्याचा थेट दूरदर्शन प्रसारण पाहता येईल. SonyLIV च्या वेबसाइटवरसुद्धा सामना लाइव्ह पाहण्याची सुविधा असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.