Mumbai news – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाचा तडे

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळी ते कांजुरमार्ग दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील रुळाला तडे गेले असून त्यामुळे दादरहून ठाणे, कल्याणच्या दिशेने धावणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. या मार्गावरील 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.