कवडीमोल दराने विकत घेतलेला ‘तो’ खेळाडू हिरा निघाला, रणजी स्पर्धेत धुमाकूळ घातला, काव्या मारनची


रविचंद्रन स्मरण यांनी दुसरं द्विशतक ठोकलं मराठी बातम्या : काव्या मारनच्या सनराइजर्स हैदराबाद संघाने ज्या खेळाडूला फक्त 30 लाखांमध्ये संघात घेतले, तो 22 वर्षीय पठ्ठ्या आता रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घालत आहे. कर्नाटकचा युवा फलंदाज रविचंद्रन स्मरण (Ravichandran Smaran) रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने फक्त तीन सामन्यांत दुसरे द्विशतक ठोकले आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 227 धावा ठोकत कर्नाटकला भक्कम स्थितीत पोहोचवले. त्याच्या या सलग धमाकेदार कामगिरीने एसआरएचलाही स्पष्ट संदेश दिला आहे की, संधी मिळताच हा खेळाडू कमाल करू शकतो.

रणजी ट्रॉफी 2025/26 हंगामात 22 वर्षीय स्मरणची कामगिरी अफलातून दिसत आहे. कर्नाटककडून खेळताना त्याने तीन सामन्यांत दोन द्विशतके झळकावत सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे. चंदीगडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी (17 नोव्हेंबर) त्याने नाबाद 227 धावा केल्या.

362 चेंडूंच्या त्याच्या डावामध्ये 16 चौकार आणि 2 षटकार आले. त्याच्या खेळीमुळे कर्नाटकीने फक्त दोन दिवसांतच 547/8 वर डाव घोषित केला. याआधी त्याने केरळविरुद्धच्या सामन्यातही नाबाद 220 धावा ठोकल्या होत्या.

कर्नाटकची सुरुवात खराब, पण….

चंदीगडविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकची सुरुवात खराब झाली होती. 64 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतर स्मरणने करुण नायरसोबत चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. नायर 95 धावांवर बाद झाला, पण स्मरणने लय कायम ठेवत आपले द्विशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाखेर चंदीगडने कर्नाटकच्या 547 धावांच्या प्रत्युत्तर 72/4 अशी अवस्था झाली. पहिल्या डावात 62 धावा करणाऱ्या श्रेयस गोपालने गोलंदाजीतही चमक दाखवत 3 विकेट्स घेतल्या आणि विरोधी संघाला पूर्णपणे दडपून टाकले.

सनराइजर्स हैदराबादने 30 लाखांमध्ये रिटेन केले…

आयपीएलच्या दृष्टीने पाहिले तर स्मरणला सनराइजर्स हैदराबादने 30 लाखांमध्ये रिटेन केले आहे. 2025 च्या मेगा ऑक्शनमध्येही त्याला ह्याच किंमतीत घेतले होते. अद्याप त्याला SRHकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, पण रणजीतील त्याच्या दमदार खेळी स्पष्ट सांगते की त्या संधीपासून तो आता फार दूर नाही. (Ravichandran Smaran slams Second Double Century)

हे ही वाचा –

India vs Oman Live Streaming : सेमीफायनलचा तिढा आज सुटणार… टीम इंडियावर ‘करो या मरो’ची लढत, वैभव सूर्यवंशी किती वाजता दिसणार ॲक्शनमध्ये? जाणून घ्या

आणखी वाचा

Comments are closed.