नवी मुंबई मेट्रोची कोटीच्या कोटी उड्डाणे

नवी मुंबई मेट्रोमधून गेल्या दोन वर्षांत एक कोटी 15 लाख 28 हजार 297 प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ 17 नोव्हेंबर 202३ रोजी झाला होता. या – टप्प्यात मेट्रोची सेवा बेलापूर ते पेंधर दरम्यान दिली जात आहे. या मार्गावर – दिवसेंदिवस मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने मेट्रोने – दोन वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पहिला टप्पा हा 11 किलोमीटरचा आहे. या टप्प्यात दोन वर्षांपूर्वी प्रवासी सेवा सुरू झाली आहे. या मार्गावर गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो चालवली जात आहे. गर्दीचा कालावधी संपल्यानंतर ही वेळ 15 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मेट्रोमुळे तळोजा आणि खारघरमधील नागरिकांना मोठा दिलासा – मिळाला आहे. दरम्यान, मेट्रोमुळे तळोजा, खारघर आणि बेलापूर या भागांना – चांगली कनेक्टिव्हीटी लाभली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय – सिंघल यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.