पहिल्या सामन्यात पराभव, आता भारत अन् द. अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्याची वेळ बदलली; BCCI चा


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी अपडेट : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी फक्त 124 धावांचे लक्ष्य मिळूनही शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 93 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेने तब्बल 15 वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकण्याची कामगिरी केली असून या विजयासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिकेत परतण्यासाठी गुवाहाटीत होणारी दुसरी आणि अखेरची कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागणार आहे.

22 नोव्हेंबर रोजी दुसरा कसोटी सामना….

दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबर (शनिवार) रोजी गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याची वेळ बदलली आहे. कोलकाता कसोटी सकाळी 9.30 वाजता सुरू झाली होती, पण गुवाहाटीतील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होईल. कारण पूर्वोत्तर भारतात सूर्योदय आणि सूर्यास्त तुलनेने लवकर होतात. त्यानुसार बीसीसीआयने कसोटी सामन्याची वेळ पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयने का बदलली वेळ?

या कसोटीत आधी टी-ब्रेक आणि नंतर लंच ब्रेक घेतला जाणार आहे, कसोटी क्रिकेटमधील ही एक आगळीवेगळी पद्धत असेल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले, “हिवाळ्यात पूर्वोत्तर भारतात सूर्यास्त खूप लवकर होतो. संध्याकाळी 4 नंतर प्रकाश कमी होतो, त्यामुळे खेळ पुढे चालू ठेवणे अवघड होते. म्हणून सामना सकाळी 9 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

नवीन वेळापत्रकानुसार गुवाहाटी कसोटी सामन्याचे वेळापत्रक

नाणेफेक – सकाळी 8:30
पहिले सत्र – सकाळी 9:00 वाजता सुरू होऊन 11:00 वाजता संपेल.

टी-ब्रेक – सकाळी 11 ते 11:20 वाजता, 20 मिनिटांचा टी-ब्रेक
दुसरे सत्र – सकाळी 11:20 वाजता सुरू होऊन दुपारी 1:20 वाजता संपेल.

लंच ब्रेक – दुपारी 1:20 ते दुपारी 2:00
शेवटचे सत्र दुपारी 2:00 वाजता सुरू होऊन 4:00 वाजता संपेल.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संपूर्ण संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, देवदत्त पडिकल, आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी.

दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्झी, डेवाल्ड ब्रेविस, काइल व्हॅरेन (कर्णधार), सायमन हार्मर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, कॉर्बिन बॉश, सेनुरान मुथुसामी, झूबान आणि एम.

आणखी वाचा

Comments are closed.