वैभव सूर्यवंशीचं नाव ऐकूनच ओमानच्या टीमला घाम फुटला; एकच मोठा शॉट अन् महारिकॉर्ड रचण्याची संधी
IND-A vs Oman T20 सामना Live Streaming Asia Cup Rising Stars 2025 : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025मध्ये वैभव सूर्यवंशीसमोर वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची सुवर्णसंधी आहे. आज भारताचा सामना ओमानशी होणार असून, या सामन्यात वैभव फक्त दोन षटकार ठोकण्यात यशस्वी झाला, तर एका एडिशनमध्ये सर्वाधिक छक्क्यांचा नवा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल.
आमचे नेक्स्ट जनरल ब्लूज उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहेत! 💪🔥
पहा #TeamIndia मध्ये ओमानशी सामना #DPWorldAsiaCupRisingStars2025आज रात्री ८ वाजता, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी LIV वर लाइव्ह.#SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/6BAeNAAc0D
— सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@SonySportsNetwk) 18 नोव्हेंबर 2025
सध्या हा रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या सदीकुल्लाह अटलच्या नावावर आहे. अटलने 2024 मध्ये एका एडिशनमध्ये एकूण 19 षटकार ठोकले होते. वैभवाने आज दोन षटकार मारताच तो 20 चा आकडा गाठणारा आशिया कप रायझिंग स्टार्स इतिहासातील पहिला फलंदाज ठरेल. या वर्षी आतापर्यंत वैभवच्या बॅटमधून 18 षटकार मारले आहेत.
आशिया कप रायझिंग स्टार्सच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
सादिकुल्ला अटल – 19 (2024)
वैभव सूर्यवंशी – 18 (2025)
नजीबुल्ला झाद्रान – १५ (२०१७)
दरवेश रसूल – १२ (२०१९)
हिम्मत सिंग – 9 (2018)
कामरान गुलाम – ६ (२०२३)
उदारा सुपेशता जयसुंदरा – 5 (2013)
फक्त षटकारांमध्येच नाही, तर वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडत आहे. 14 वर्षांच्या या युवा पठ्ठ्याने दोन डावांत तब्बल 189 धावा केल्या असून तो सध्या 2025 मधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आशिया कप रायझिंग स्टार्सच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रमही सध्या सदीकुल्लाह अटलच्या नावावर आहे. अटलने 2024 च्या स्पर्धेत 5 डावांत 368 धावा केल्या होत्या.
भारताकडून एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान के. एल. राहुलच्या नावावर असून, राहुलने 2013 मध्ये 5 डावांत 321 धावा ठोकल्या होत्या. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत केवळ दोन सामने खेळून 94.50 च्या सरासरीने 189 धावा, त्यात 16 चौकार आणि 18 षटकार, अशी धडाकेबाज कामगिरी केली आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्सच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
2024 – सेदीकुल्लाह अटल (अफगाणिस्तान, 368, 5 डाव)
2017 – चरिथ असलंका (338 धावा – 5 डाव)
2013 – केएल राहुल (321 धावा, 5 डाव)
2018 – कामिंदू दिलांका मेंडिस (310 धावा – 5 डाव)
2019 – रोहेल नझीर (पाकिस्तान, 302 – 5 डाव)
2023 – अविष्का फर्नांडो (श्रीलंका, 255 – 4 डाव)
2025 – वैभव सूर्यवंशी (भारत, 189 – 2 डाव)
सामना कधी आणि कुठे होणार? (India A vs Oman Rising Stars Asia Cup Live Streaming)
भारत आणि ओमान यांच्यातील सामना 18 नोव्हेंबर रोजी कतारची राजधानी दोहा येथे असलेल्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.
थेट प्रसारण कुठे पाहता येईल? (When, where and how to watch IND vs OMN live)
सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLIV अॅपवर उपलब्ध असेल. तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर सामन्याचा थेट दूरदर्शन प्रसारण पाहता येईल. SonyLIV च्या वेबसाइटवरसुद्धा सामना लाइव्ह पाहण्याची सुविधा असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.