भारत–दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीची वेळ बदलली; BCCI चा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर 22 नोव्हेंबर (शनिवार) रोजी दुसरी व अंतिम कसोटी खेळवली जाईल. कोलकात्यातील सामना सकाळी 9:30 वाजता सुरू झाला होता; मात्र पूर्वोत्तर भारतातील लवकर होणाऱ्या सूर्यास्तामुळे या वेळी कसोटी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, हिवाळ्यात संध्याकाळी 4 नंतर प्रकाश कमी होतो. अशा वेळी खेळ सुरू ठेवणे कठीण होत असल्याने सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला. विशेष म्हणजे या सामन्यात आधी टी-ब्रेक आणि नंतर लंच ब्रेक घेतला जाणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ही एक दुर्मीळ पद्धत असेल.
नवीन वेळापत्रक
नाणेफेक: सकाळी 8:30
पहिले सत्र: 9:00 ते 11:00
टी-ब्रेक: 11:00 ते 11:20
दुसरा भाग: 11:20 ते 1:2
लंच: 1:20 ते 2:00
तिसरे सत्र: 2:00 ते 4:00
दोन्ही देशाचे संघ-
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, देवदत्त पडिकल, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी.
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्झी, डेवाल्ड ब्रेविस, काइल व्हॅरेन (कर्णधार), सायमन हार्मर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, कॉर्बिन बॉश, सेनुरान मुथुसामी, झूबान, एम.
टीम इंडियाच्या पहिल्या कसोटी पराभवानंतर आता गिलची सेना मालिकेत परत येते का, की आफ्रिका 15 वर्षांच्या अपयशाला पूर्णविराम देत मालिकाही आपल्या नावावर करते? 22 नोव्हेंबरला गुवाहाटीत याचे उत्तर मिळणार आहे!
Comments are closed.