स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह…
Nanded Crime: नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर संशयाचे धुके गडद झाले आहे. (Nanded Crime news) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय.
नेमका प्रकार काय ?
शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर संशयाचे धुके गडद झाले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक, सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केली.
आत्महत्येचा बनाव केल्याचा नातेवाईकांचा आरोप
याप्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे शीतलच्या कुटुंबियांनी केलेला आरोप. शीतलची हत्या करून तिला आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. शीतलचा स्वभाव, तिची सध्याची मानसिक अवस्था आणि अभ्यासात असलेली प्रगती यांचा उल्लेख करत तिने आत्महत्या करणे शक्य नसल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्या खोलीत शीतल वारंवार जात असे. मात्र, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाले किंवा शीतलला मानसिक त्रास दिला गेला का, याची सविस्तर चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
नातेवाईकांनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे शीतलचा छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमार्टेम केला जाणार आहे. दुहेरी पोस्टमार्टेममुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पांगरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा:
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
आणखी वाचा
Comments are closed.