Male Grooming Tips: पुरुषांनी वॅक्सिंग करण्याआधी जाणून घ्याव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
आजकाल ग्रूमिंग आणि क्लीन लूकला पुरुषही तितकंच महत्त्व देत आहेत. काही वर्षांपूर्वी वॅक्सिंग हा विषय फक्त महिलांशी जोडला जायचा. पण आता बदललेल्या लाइफस्टाइल, फिटनेसची आवड आणि प्रोफेशनल लूक यामुळे पुरुषही वॅक्सिंगकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. मात्र पहिल्यांदाच वॅक्सिंग करणाऱ्या पुरुषांनी काही गोष्टी आधी समजून घेणं खूप आवश्यक आहे. योग्य माहिती नसल्यास त्वचेवर त्रास, लालसरपणा आणि इरिटेशन यांसारख्या समस्या होऊ शकतात. (mens waxing tips before waxing important things to know)
पुरुषांच्या केसांची जाडी आणि त्वचेचा रफ टेक्स्चर लक्षात घेतलं तर वॅक्सिंग योग्य प्रकारे न केल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे वॅक्सिंग करण्याआधी आणि नंतर या 7 गोष्टी नक्की पाळा.
1. स्वतः वॅक्सिंग करण्याचा प्रयोग टाळा
पुरुषांचे केस जाड आणि दाट असतात. त्यामुळे घरच्या घरी स्वतः वॅक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्यास वेदना जास्त होतात आणि केस नीट निघत नाहीत. एखाद्या प्रोफेशनलकडे वॅक्सिंग केल्यास टेक्निक योग्य असते आणि त्रास कमी होतो.
2. वॅक्सिंगच्या 1–2 दिवस आधी स्किन एक्सफोलिएट करा
स्किनवरची डेड स्किन निघाल्याने केस सहज बाहेर येतात. यामुळे वॅक्सिंग स्मूद होते आणि वेदनाही कमी होतात. घरगुती स्क्रबही वापरू शकता.
3. सेंसिटिव्ह स्किन असल्यास जपून वॅक्स करा
पुरुषांची त्वचा दिसायला रफ असली तरी सेंसिटिव्ह असू शकते. अशावेळी वॅक्सिंग केल्यास लाल चट्टे, इचिंग किंवा जळजळ येऊ शकते. त्यामुळे पहिल्याच वेळेला मोठा भाग वॅक्स न करता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम.
4. वॅक्सिंगआधी आणि नंतर बर्फ लावल्याने आराम मिळतो
वॅक्सिंग करण्याच्या आधी स्किनवर बर्फ लावल्यास पोर थोडे बंद होतात आणि वेदना कमी जाणवतात. वॅक्सिंगनंतर आइस-पॅक किंवा अॅलोवेरा जेल लावल्यास लालसरपणा, सूज आणि इचिंग पटकन कमी होते.
5. पॅच टेस्ट करायला विसरू नका
पुरुषांची त्वचा केसांमुळे रफ आणि कधी कधी संवेदनशील असते. त्यामुळे पूर्ण वॅक्सिंग करण्याआधी छोटा पॅच टेस्ट करा. जर लालसरपणा किंवा जळजळ दिसली नाही, तरच पुढे वॅक्सिंग करा अन्यथा करू नका.
6. आपल्या स्किनसाठी योग्य वॅक्स निवडा
मार्केटमध्ये अनेक प्रकारचे वॅक्स उपलब्ध आहेत. जसं की जाड आणि हार्ड केस असतील तर त्यासाठी हार्ड किंवा स्ट्रॉन्ग वॅक्स. सेंसिटिव्ह स्किन असेल तर अॅलोवेरा किंवा शुगर-बेस्ड वॅक्स निवड कारण योग्य वॅक्स निवडल्यास वेदना कमी आणि परिणाम चांगले मिळतात.
7. वॅक्सिंगनंतर लगेच वर्कआउट किंवा हॉट शॉवर घेऊ नका
वॅक्सिंगनंतर त्वचा काही वेळ संवेदनशील असते. लगेच व्यायाम किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यास घामामुळे रॅशेस किंवा बम्प्स येऊ शकतात. किमान 24 तास या गोष्टी टाळा.
वॅक्सिंग हे पुरुषांसाठीही एक चांगलं ग्रूमिंग ऑप्शन आहे. पण ते योग्य पद्धतीने केल्यासच फायदा होतो. पहिली वेळ असेल तर घाई न करता प्रोफेशनल गाईडन्स घेणं उत्तम.
Comments are closed.