परांड्यात तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचे गट आमने-सामने, राजकीय वादातून दोन गटात दगडफेक


धाराशिव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचालीला सुरुवात केली आहे. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशीव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत (तानाजी सावंत) आणि माजी आमदार राहुल मोटे ( Rahul Mote) यांचे गट आमने-सामने आले आहेत. परंडा नगरपरिषदेत राजकीय वादातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

परांडा तालुक्यात शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचे गट आमने सामने  आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडले आहेत. निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्याने गोंधळ झाल्याची माहिती मिळाली आहे. यातून तानाजी सावंत आणि राहुल मोटे गटाचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. तानाजी सावंत गटाचे उमेदवार झाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात वादावादी झाली आहे. तसेच राजकीय वादातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना देखील घडली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Shivaji Sawant: मोठी बातमी : तानाजी सावंतांच्या भावाचा भाजप प्रवेश पुढे ढकलला, नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.