IND vs SA: दुसऱ्या कसोटीमधील पराभवानंतर टीम इंडियातील 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता? गुवाहाटीत मोठी परीक्षा!

टीम इंडिया (Team india) पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभूत झाली. फक्त 124 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना भारताची संपूर्ण टीम केवळ 93 धावांवर ऑलआऊट झाली. फलंदाजी पूर्णपणे ढासळली आणि तीन फलंदाज तर खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले.

आता मालिकेचा दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळला जाणार असून, तिथे टीम इंडियासाठी प्रतिष्ठेची लढत असेल.

जर भारतीय संघाने दुसरीही कसोटी गमावली तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल (Morne Morkel) यांच्यावरही दबाव वाढू शकतो. घरच्या मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका गमावली, तर फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्या भूमिकेवरही चर्चा होऊ शकते. तसेच सहायक प्रशिक्षक रियान टेन डोइशे यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Comments are closed.