IND vs SA: शुबमन गिलनंतर गुवाहाटी कसोटीआधी 3 आफ्रिकन खेळाडूही रुग्णालयात? कर्णधार टेम्बा बावुमा चिंतेत
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. कोलकाता येथे झालेला पहिला कसोटी सामना आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिका जिंकण्यासाठी आफ्रिकेला आता गुवाहाटीतील दुसरा कसोटी सामना जिंकणे जरूरी आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आफ्रिकन संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संघातील 3 महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत.
रेव स्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू मार्को यानसेन, सायमन हार्मर आणि केशव महाराज कोलकात्यातील वुडलॅंड्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. हे तिघेही खेळाडू हेल्थ चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, ते नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले होते याबद्दल अजून स्पष्ट माहिती आलेली नाही. त्यांच्या फिटनेसबाबतही अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या तिघांनीही कोलकाता कसोटीमध्ये टीम इंडियाला खूप त्रास दिला होता. त्यामुळे हे खेळाडू गुवाहाटी कसोटीमध्ये नसतील तर दक्षिण आफ्रिकेची अडचण मोठ्या प्रमाणात वाढू शकते. कगिसो रबाडा (Kagiso Rabada ) तर दुखापतीमुळे कोलकाता कसोटीमध्ये खेळू शकला नव्हता.
या बातमीमुळे कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) नक्कीच चिंताग्रस्त असेल. यानसेनच्या जागी आता फिट झालेला कगिसो रबाडा प्लेइंग XI मध्ये परतू शकतो. सायमन हार्मरच्या जागी सेनुरन मुथुस्वामीला संधी मिळू शकते. मात्र केशव महाराजच्या जागी कोणाला संधी दिली जाईल याबद्दल स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण आफ्रिका नक्कीच इच्छित असेल की हे तिघेही खेळाडू गुवाहाटी कसोटीसाठी फिट होतील, जेणेकरून ते टीम इंडियाला पुन्हा दबावात टाकू शकतील.
Comments are closed.