IND vs SA: गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका संघात मोठा फेरबदल! स्टार खेळाडूची दमदार एन्ट्री
कोलकाता कसोटीनंतर आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (Team india vs South Africa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ तयारीत व्यस्त आहेत. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने एका खेळाडूला पुन्हा संघात सामील केले आहे. तर दुसरीकडे, शानदार विजय मिळवलेल्या दक्षिण आफ्रिका संघातही एका मॅच विनर खेळाडूची अचानक एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे आफ्रिकन टीम आणखी मजबूत झाली आहे.
गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका संघात मोठा बदल करण्यात आला आहे. आफ्रिकेच्या संघात वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीची (Lungi Engidi) एंट्री झाली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा अजूनही पूर्णपणे फिट नाही, त्यामुळेच तो कोलकाता कसोटीमध्ये खेळू शकला नव्हता. याच कारणामुळे आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीच्या आधी एनगिडीला संघात बोलावले आहे.
दुखापतीमुळे एनगिडी बराच काळ संघाचा भाग नव्हता. 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर तो आता पुन्हा कसोटी टीममध्ये परतला आहे. याच दरम्यान मार्को यानसेनही दुखापतीचा सामना करत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे एनगिडीला थेट प्लेइंग प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे.
Comments are closed.