Delhi Blast Update:स्फोटाचे धागेदोरे,गौप्यस्फोटाने हादरे;हमाससारखा हल्ला होणार होता? Special Report
Delhi Blast Update:स्फोटाचे धागेदोरे,गौप्यस्फोटाने हादरे;हमाससारखा हल्ला होणार होता? Special Report
दिल्ली स्फोटाला आता आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. तरीही या स्फोटाच्या चौकशीत आता गौप्यस्फोटाचे हादरे बसतायत. त्यात तपास यंत्रणांच्या हाती अशी काही माहिती लागलीय ज्यावरून या हल्ल्याची भीषणता किती मोठी असू शकली असती याची कल्पना येते. पाहूया याचसंदर्भातला रिपोर्ट.
दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या संपूर्ण कटाची पाळंमुळे तपास यंत्रणा खणून काढत आहेत.
तपास यंत्रणांच्या हाती लागलेली माहिती धक्कादायक आहे..
डॉ. उमरचा साथीदार जासिर बिलालने अखेर तोंड उघडल्याची माहिती आहे.
जासिर बिलालने संपूर्ण कट यंत्रणांना सांगितल्याची माहिती मिळतेय,
या संपूर्ण मोड्युलची मोडस ऑपरेंडीही फार खतरनाक आहे.
या दहशतवादी डॉक्टरांनी एकमेकांशी संपर्कासाठी सिग्नल अॅपचा वापर केला.
त्यासाठी सिग्नल अॅपचा ग्रुप केला. त्याचा अॅडमिन हा फरार दहशतवादी डॉ. मुझफ्फर होता.
तर डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन या ग्रुपचे मेंबर्स होते
Comments are closed.