घरात घालण्यासाठी आरामदायी आउटफिट्स

एखाद्या व्यक्तीच्या राहणीमानावरून व्यक्ती कशी असेल याचा अंदाज लावला जातो. त्यामुळे घराबाहेर जाताना टापटीप कपडे घालून आपण बाहेर निघतो. पण, हल्ली बाहेर जातानाच नाही तर घरातही टापटीप असणे गरजेचं झालं आहे. आता टापटीप राहायचे म्हणजे नवीन, भपकेदार, जरीचे कपडे घरात घालायचे असे नाही कारण अशा कपड्यांमुळे तुम्हाला आरामदायी वाटणार नाही. तसेच घरातील कामेही व्यवस्थित होणार नाही. विशेष करून महिलांना हे शक्य होणार नाही. त्यामुळे आज आपण असे आउटफिट जाणून घेऊयात जे आरामदायी असण्यासह स्टायलिश लूक देण्यास फायदेशीर असतात.

काफ्तान –

उन्हाळा असो की हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये कफ्तान अधिक आरामदायी पोशाख आहे. कफ्तानच्या कंबरेवरील धाग्याने तुम्हाला गरजेनुसार घट्ट किंवा सैल आकार करता येतो.

लांब शर्ट –

तुम्ही शर्टंमध्ये कम्फर्टेबल असाल तर हा पर्याय उत्तम हे. लॉंग शर्ट्सोबत तुम्ही शॉर्ट पॅंट किंवा लॉंग लेंहेगा घालू शकता.

हेही वाचा – Velvet Suits For Wedding Season: लग्न समारंभात ट्राय करा हे ट्रेंडिंग व्हेल्वेट सूटचे प्रकार

को-ऑर्डर सेट –

सध्या को ऑर्ड सेटची खूप चर्चा आहे. हे सेट सैलसर असल्याने घरात घालण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

नाईट सुट –

हाफ स्लीव्हज शर्ट आणि लेस डिटेलसह शॉर्ट्स तुम्ही घरात घालू शकता. यात बाजारात अनेक रंग उपलब्ध मिळतील.

कॉटन नाईट ड्रेस –

सुती कापड घरात घालण्यासाठी उत्तम कापड आहे. तुम्ही दिवसभर हे कॉटन नाईट सुट घालू शकता.

फ्रॉक एक तुकडा –

गुडघ्याखाली असणारे फ्रॉक वन पीस तुम्ही घरात घालू शकता. यामुळे तुम्हाला आरामदायी वाटेलच शिवाय स्टायलिश लूक मिळेल.

ग्राफिक टी –

लांब आणि सैल टी शर्ट ज्यावर ग्राफिक असलेले तुम्ही पाहिले असतील. मुलींमध्ये याची क्रेझ जास्त दिसून येते. तुम्हाला हे टी शर्ट नक्कीच आरामदायी ठरू शकतात.

टी शर्ट पायजमा सेट –

जर तुम्हाला शॉर्ट, नाईट ड्रेस किंवा कफ्तान स्टाइलचे नाईट वेअर आवडत नसतील तर तुम्ही घरात फुल पायजमा आणि टी शर्ट घालू शकता.

हेही वाचा – तरुणींमध्ये वाढतोय फिंगर पियर्सिंग’चा ट्रेंड, तज्ज्ञांनी सांगितले स्टायलिश लुकसह आहेत अनेक धोके

Comments are closed.