NZ vs WI: ब्रायन लाराचा विक्रम धोक्यात, न्यूझीलंडविरुद्ध 12 धावा करताच शाई होप इतिहास रचणार

होपने आतापर्यंत खेळलेल्या 146 एकदिवसीय सामन्यांच्या 141 डावांमध्ये 5988 धावा केल्या आहेत. जर त्याने 12 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद 6000 धावा करणारा दुसरा खेळाडू बनेल.

सध्या हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे, ज्याने 155 डावात हे स्थान गाठले. या यादीत विवियन रिचर्ड्स १४१ डावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

आत्तापर्यंत वेस्ट इंडिजच्या फक्त सहा खेळाडूंनी 6000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत ज्यात ख्रिस गेल, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, डेसमंड हेन्स, विवियन रिचर्ड्स आणि रिची रिचर्डसन यांचा समावेश आहे.

याशिवाय, जर तो शतक झळकावण्यात यशस्वी ठरला तर तो वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर येईल. होपने आतापर्यंत 18 शतके झळकावली असून लाराच्या नावावर 19 शतके आहेत. ख्रिस गेल २५ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेमध्ये होपने 45 चेंडूत 37 धावांची खेळी केली.

संघ खालीलप्रमाणे आहेत

वेस्ट इंडिज: शाई होप (कर्णधार), ॲलेक अथानाझ, अकीम ऑगस्टे, जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, अमीर जांगू, जोहान लेन, खारी पियरे, शेरफेन रदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, शामर स्प्रिंगर.

न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, झॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर, विल यंग.

Comments are closed.