Rising Asia Cup; टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये एंट्री! करो या मरो सामन्यात ओमानचा 6 विकेट्सने धुव्वा

जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाने आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये ओमानवर शानदार विजय मिळवला. ओमानने भारतासमोर 136 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र इंडिया ए ने हे लक्ष्य फक्त 17.5 ओव्हरमध्ये, 6 विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयाने भारताला थेट सेमी-फायनलमध्ये स्थान मिळाले.

हर्ष दुबे हा सामना फिरवणारा खेळाडू ठरला. त्याने 44 चेंडूत 53 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चौकार व 1 षटकार मारला. कर्णधार जितेश शर्माने 4 नाबाद धावा करत जोडी सांभाळली. त्यापूर्वी फलंदाजीची सुरुवात अपेक्षितप्रमाणे चांगली गेली नाही. वैभव सूर्यवंशी (12) आणि प्रियांश आर्या (10) लवकर बाद झाले. पण नमन धीर (30) आणि नेहल वढेरा (23) यांनी संघाला विजयाच्या जवळ आणले.

ओमानकडून जय ओडेदरा, शफीक जान, समय श्रीवास्तव आणि आर्यन बिष्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली, पण त्याचा परिणाम भारताच्या विजयावर झाला नाही.

भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. टॉस जिंकून कर्णधार जितेश शर्माने ओमानला फलंदजीचं आमत्रंण दिले. ज्यामध्ये ओमानला 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून फक्त 135 धावांवर अडवलं. वसिम अलीने सर्वाधिक 54 आणि कर्णधार हम्माद मिर्झाने 32 धावा केल्या. भारतासाठी सूयश शर्मा आणि गुरजनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

या विजयाने इंडिया पाकिस्ताननंतर सेमी-फायनलमध्ये पोहोचणारी दुसरी टीम बनली. हर्ष दुबेच्या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आले.

Comments are closed.