राजकीय पक्ष संपविने हा भाजप आणि संघाचा अजेंडा

राजकीय पक्ष संपवणे हाच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीद्वारे ते स्पष्ट झाले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही याविषयी शंका आहे. राजदवर त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारला आहे. त्याच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असे आंबेडकर म्हणाले.
आदिवासींचा सर्वात मोठा शत्रू
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण वरून गोड व आतून खोटे होते. वास्तव हे आहे की, नरेंद्र मोदी, भाजप व संघ आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असे ते म्हणाले.

Comments are closed.