T20 TriSeries: दुबळ्या झिंबाब्वेविरुद्ध पाकिस्तानचा संघर्षपूर्ण विजय, 4 चेंडू आधी सामना जिंकला!

यजमान पाकिस्तानने झिंबाब्वेवर 5 विकेट्सने विजय मिळवून टी20 तिरंगी मालिकेत शानदार सुरुवात केली आहे. झिंबाब्वेने पाकिस्तानला सहज हरवू दिले नाही आणि प्रत्येक धावासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. झिंबाब्वेने पाकिस्तानसमोर 148 धावांचं आव्हान उभं केलं, आणि सामना शेवटच्या 4 चेंडू आधी पाकिस्तानने जिंकला.

सलामी जोडी साहिबजादा फरहान आणि सॅम अयुबने सुरुवातीला चांगला संघर्ष केला. परंतु साहिबजादा फरहान 16 धावांवर आऊट झाला, तर सॅम अयुब 22 धावा करून बाद झाला. बाबर आझम झिंबाब्वेच्या गोलंदाजांसमोर शून्यावर बाद झाला. कर्णधार सलमान आगा 1 धावावर आऊट झाला.

पाचव्या विकेटसाठी फखर झमान आणि उस्मान खान यांनी निर्णायक भागीदारी केली. त्यांनी फक्त 39 बॉलमध्ये 61 धावांची भागीदारी केली. फखर झमान 32 चेडूंमध्ये 44 धावा करून बाद झाला.

नंतर उस्मान खान आणि मोहम्मद नवाझ यांनी अंतिम क्षणात नॉट आऊट राहून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या जोडीने 20 चेडूंमध्ये 36* धावा केल्या. उस्मानने (37) तर नवाझने (21*) धावा केल्या. झिंबाब्वेसाठी ब्राड एव्हान्सला 2 विकेट्स मिळाल्या, तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टॉस जिंकून पाकिस्तानने झिंबाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. झिंबाब्वेने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. ज्यामध्ये ब्रायन बेनेटने 49, टी मारुमनीने 30, आणि कर्णधार रमी राझाने अखेरपर्यंत नाबाद 34 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाझने 2 विकेट्स घेतल्या, तर शाहीन आफ्रीदी, सलमान मिर्झा, सॅम अयुब आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Comments are closed.