कोलकातानंतर गुवाहाटीतही ‘टर्निंग’ खेळपट्टीचा प्लॅन? गंभीरच्या हट्टामुळे BCCIची झोप उडाली, कशी अ


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी गुवाहाटी खेळपट्टी अपडेट : कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला त्यांच्याच शस्त्राने म्हणजे फिरकी गोलंदाजीने पराभूत करून सर्वाना चकित केले. अवघ्या 66 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघ दोन्ही डावांत 200 धावांचाही टप्पा ओलांडू शकला नाही. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंकडून टीम इंडिया हेड कोच गौतम गंभीरवर जोरदार टीका होत आहे.

गौतम गंभीरने पण मान्य केले आहे की कोलकात्यातील टर्निंग विकेटची मागणी टीम मॅनेजमेंटनेच केली होती. पण त्याच टर्निंग विकेटवर भारताला 30 धावांनी हार पत्करावी लागली. भारताने या सामन्यात तब्बल चार फिरकीपटूंना उतरवले होते; परंतु दोन्ही डावांत प्रत्येकी चार-चार विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा स्पिनरच चमकून गेला. तोही असा खेळाडू ज्याला त्यांच्या संघात नियमित स्थान मिळत नाही.

गुवाहाटीतही ‘टर्निंग’ खेळपट्टीचा प्लॅन?

अहवालानुसार, गुवाहाटीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही गंभीरने टर्निंग विकेटवर विश्वास दाखवला आहे. यामुळे बीसीसीआयमध्ये चिंता वाढली आहे. 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पण गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी होत असल्याने बीसीसीआय अधिक सतर्क आहे.

रिपोर्टनुसार, टर्निंग विकेट दिल्यास सामन्याच्या गुणवत्तेवर आणि स्टेडियमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: या मैदानाचे क्युरेटर आशिष भौमिक हे बीसीसीआयच्या क्यूरेटर पॅनेलचे प्रमुख असल्याने, त्यांच्या होम टर्फवर पिच अपयशी ठरल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

बरसापारा खेळपट्टी लाल मातीची….

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “बरसापारा खेळपट्टी लाल मातीची आहे. रेड क्ले पिचवर नैसर्गिकरित्या बाउन्स जास्त असतो. त्यातच जर टर्न निर्माण झाला, तर चेंडू अधिक वेगाने आणि जास्त उंच उडत फिरू शकतो. हे दोन्ही संघांसाठी खेळणे अवघड ठरू शकते.” क्यूरेटरांनी पिच स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी सामन्यावेळी ती कशी वागेल, हे स्पष्ट सांगणे कठीण असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

जर जिंकलो असतो, तर पिचबद्दल तुम्ही बोललेच नसता…. – गंभीर

कोलकाता कसोटीनंतर गंभीरने पिचवर दोष टाकण्यास नकार दिला. गुवाहाटीत कोणत्या प्रकारचे पिच हवे यावर विचारताना त्याने स्पष्ट म्हटले की, “आम्ही नेहमीच असे खेळपट्टी मागितली आहे ज्यावर पहिल्या दिवशी कमीत कमी टर्न असेल आणि टॉसचा फरक पडणार नाही. आम्ही कधीच खराब किंवा रँक-टर्नर पिचची मागणी केली नाही. आम्ही सामना जिंकलो असतो, तर तुम्ही पिचबद्दल बोललाच नसता. पिच दोन्ही संघांसाठी एकसारखेच असते. त्यामुळे पिचपेक्षा आमची स्किल आणि मानसिकता सुधारण्याची गरज आहे.”

हे ही वाचा –

India A vs Oman A : वैभव सूर्यवंशीची बॅट शांत, पण टीम इंडिया दणक्यात सेमीफायनलमध्ये! उपांत्य फेरीत कोणाशी भिडणार?

आणखी वाचा

Comments are closed.