ग्रुप बी मधून 2 संघ बाहेर, ग्रुप ए मध्ये 2 जागेसाठी 3 संघ शर्यतीत; सेमीफायनलमध्ये भारत कोणाविरु


आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 भारताची उपांत्य फेरी: आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये भारताच्या अ संघाने शेवटच्या लीग सामन्यात ओमानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ‘करो या मरो’ या सामन्यात आधी गोलंदाजीने आणि नंतर फलंदाजांना धमाकेदार कामगिरी करत 136 धावांचं लक्ष्य अवघ्या 17.5 षटकांत गाठलं. या विजयामुळे टीम इंडिया संघाने ग्रुप बीमध्ये दुसऱ्या स्थानावर राहात नॉकआउट फेरी गाठली.

ग्रुप स्टेजमध्ये टीम भारत अ संघाची कामगिरी कशी होती?

भारत अ संघाचा ग्रुप स्टेजचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. पहिल्या सामन्यात यूएईवर मोठा विजय मिळवत टीमने दमदार सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला धक्का दिला. त्यामुळे तिसरा सामना ओमानविरुद्ध अक्षरशः क्वार्टर फायनलसारखा होता, जिंकलो तर सेमीफायनल, हरलो तर घरी. पण भारतीय खेळाडूंनी ओमानला सहज हरवलं आणि पुढचा मार्ग मोकळा केला.

आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणाशी?

ग्रुप बीमध्ये भारत अ संघ 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 6 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. स्पर्धेच्या नियमानुसार ग्रुप बीची नंबर 2 टीम म्हणजे भारत सेमीफायनलमध्ये ग्रुप एच्या नंबर 1 टीमशी भिडणार आहे.

ग्रुप ए मध्ये बांगलादेश अ संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याचा शेवटचा सामना श्रीलंका अ संघाने सोबत आहे. हा सामना बांगलादेश जिंकल्यास 6 गुणांसोबत तेच ग्रुप एचे टॉपर असतील.

समीकरण बदलू शकतं का?

जर श्रीलंका अ संघाने बांगलादेश अ संघाला हरवलं, तर काय? गणित रनरेटवर येऊन थांबतं, कारण दोन संघाचे समसमान गुण होती. बांगलादेशचा रनरेट आता +4.079 आहे. तर श्रीलंकाचा रनरेट: +1.384 असा आहे. श्रीलंका जिंकली, तरी रनरेटमध्ये बांगलादेशला मागे टाकणं अशक्य आहे. त्यामुळे ग्रुप एचं टॉप स्थान बांगलादेशकडेच राहणं निश्चित मानलं जातं.

त्यामुळे मोठ्या उलथापालथीशिवाय हे चित्र स्पष्ट आहे, की बांगलादेशविरुद्ध भारत सेमीफायल सामना होऊ शकतो. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना श्रीलंका किंवा अफगाणिस्तान मधील कोणाशी होईल. भारत अ आणि बांगलादेश अ दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे सेमीफायनलमध्ये जबरदस्त, हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार यात शंका नाही.

हे ही वाचा –

India vs South Africa 2nd Test : कोलकातानंतर गुवाहाटीतही ‘टर्निंग’ खेळपट्टीचा प्लॅन? गंभीरच्या हट्टामुळे BCCIची झोप उडाली, कशी असणार बरसापारा स्टेडियमची खेळपट्टी?

आणखी वाचा

Comments are closed.