दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! पहिली कसोटी जिंकवून देणारे 2 खेळाडू हॉस्पिटलमध्ये भरती, नेमकं घडलं


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना : गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. कोलकातामधील पहिला कसोटी जिंकवून देणारे दोन महत्त्वाचे खेळाडू ऑफस्पिनर सायमन हार्मर (Simon Harmer) आणि ऑलराउंडर मार्को जान्सनला (Marco Jansen) दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे  लागले. 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि निर्णायक कसोटीपूर्वी ही बातमी आफ्रिकन संघासाठी मोठी चिंता बनली आहे.

झुरळांची घायाळ घाण फाडली

ईडन गार्डन्सवर भारताविरुद्ध मिळालेल्या ऐतिहासिक 30 धावांच्या विजयात हार्मर आणि जान्सन यांचा मोलाचा वाटा होता. हार्मरने सामन्यात एकूण 8 बळी घेत भारतीय फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आणि त्यालाच ‘मॅन ऑफ द मॅच’चा सन्मान मिळाला होता. मार्को जान्सननेही पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 अशी एकूण 5 बळी घेत मोलाचा हातभार लावला. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला तब्बल 15 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी विजय मिळाला.(Simon Harmer and Marco Jansen hospital in Kolkata)

कोलकातामध्ये नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हार्मरच्या खांद्याला दुखापत झाली आहे, तर जान्सनला घशाचा संसर्ग आहे. दोघांनाही कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते, इथेच भारतीय कर्णधार शुभमन गिलचीही उपचार प्रक्रिया झाली होती. सध्या ही दुखापत किती गंभीर आहे आणि हे दोघे गुवाहाटी कसोटीत खेळू शकतील की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण हार्मर आणि जान्सनच्या अनुपस्थितीची शक्यता दक्षिण आफ्रिकेसाठी मोठे डोकेदुखी ठरू शकते. विशेषत: हार्मरसारखा प्रभावी स्पिनर उपलब्ध नसणे भारतासारख्या दमदार फलंदाजीसमोर मोठे नुकसान मानले जाईल.

टीम इंडियासाठी सुवर्णसंधी

पहिली कसोटी गमावल्यानंतर मालिकेत परत येण्यासाठी टीम इंडिया आतुर आहे. पाहुण्या संघातील दोन प्रमुख गोलंदाज जखमी असणे हे भारतासाठी मोठे फायदेशीर ठरू शकते. गुवाहाटीत विजय मिळवून भारत मालिकेला 1-1 ने बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल, आणि दक्षिण आफ्रिकेच्या जखमी खेळाडूंची गैरहजेरी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

हे ही वाचा –

Asia Cup Rising Stars 2025 : ग्रुप बी मधून 2 संघ बाहेर, ग्रुप ए मध्ये 2 जागेसाठी 3 संघ शर्यतीत; सेमीफायनलमध्ये भारत कोणाविरुद्ध भिडणार?, नेमकं समीकरण काय?, जाणून घ्या

आणखी वाचा

Comments are closed.