शिवीगाळ केली, हातवारे करुन टीम इंडियाला नडले; आता फायनलमध्ये भारत पाकिस्तानशी बदला घेणार?
आशिया कप रायझिंग स्टार्स फायनल 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान कसे भिडतील: आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांची घोषणा अखेर झाली आहे. ग्रुप बीमधील सर्व सामना पूर्ण झाले असून या गटात टीम इंडिया आणि पाकिस्तान हे संघही होते. पाकिस्तानने सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता आणि आता भारतानेही टॉप-4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. भारत-पाकिस्तानची भिडंत सेमीफायनलमध्ये नाही, पण फायनलमध्ये नक्की होऊ शकते, अशी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? जाणून घ्या समीकरण
पाकिस्तान संघाने तीनही सामने जिंकत थेट सेमीफायनल गाठली. भारताने तीनपैकी दोन सामने जिंकले असून एकमेव पराभव पाकिस्तानकडून झाला. त्यामुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध बदला घ्यायचा असेल तर फायनलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीत ग्रुप ए मधील वेगवेगळ्या संघांशी भिडतील. दोघांनीही सेमीफायनल जिंकले तर फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता जोरात आहे.
ग्रुप स्टेज सामन्यात शिवीगाळ केली, हातवारे करुन टीम इंडियाला नडले…
रविवारी झालेल्या आशिया कप रायझिंग स्टार्सच्या (Asia Cup Rising Stars) ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या कृतींमुळे वाद निर्माण झाला. सामन्यादरम्यान, पाकिस्तानचा युवा फिरकीपटू साद मसूदने (Saad Masood) भारतीय उपकर्णधार नमन धीरला (Naman Dhir) बाद केल्यानंतर अत्यंत आक्रमक सेलिब्रेशन करत शिवीगाळ केली आणि हातवारे करत बाहेर जाईला सांगितले. त्यामुळे जर फायनलमध्ये पाकिस्तान आला, तर त्यांना पराभूत करून टीम इँडिया त्याचा बदला घेऊ शकते.
ग्रुप A मधील दोन्ही जागेवर आज होणार शिक्कामोर्तब
ग्रुप A मधील दोन महत्त्वाचे सामना आज (19 नोव्हेंबर) खेळले जाणार आहेत, बांगलादेशविरुद्ध श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध हाँगकाँग असा सामना रंगणार आहे. या सामन्यांचे परिणाम ठरवतील की ग्रुप ए मधून कोणते दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ भारताशी भिडेल. दुसऱ्या क्रमांकाचा संघ पाकिस्तानशी खेळले.
बांगलादेशचा एक पाय सेमीफायनलमध्ये
बांगलादेश संघाने जर आजचा सामना जिंकला, तर त्याची सेमीफायनल प्लेस जवळपास निश्चित आहे. जर पराभव झाला, तर श्रीलंकेचेही गुण समान होतील आणि मग निर्णय नेट रन रेटवर होईल. सध्या बांग्लादेशचा नेट रन रेट चांगला आहे, त्यामुळे त्यांचे टॉप-4 मध्ये जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. अफगाणिस्तान देखील विजय मिळवून 4 गुणांपर्यंत पोहोचू शकतो, पण त्यालाही नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागेल. हाँगकाँग स्पर्धेतून आधीच बाहेर झाला आहे. ग्रुप बीमधून UAE आणि ओमानचा प्रवास संपला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.